शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘लालपरी’ला लागले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:52 IST

वाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे. या बसगाड्या वारंवार प्रवासादरम्यान मार्गावरच बंद पडत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून, बसफेरी सोडण्यापूर्वी तपासणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारीही मंगरुळपीर आगाराची मंगरुळपीर-शिर्डी ही बस १२ किलोमीटर धावल्यानंतर रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना अमरावती-बार्शी या बसमध्ये वाशिमपर्यंत जावे लागले.वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड, हे चार आगार आहेत. या चारही आगारात मिळून दरदिवशी शेकडो बस विविध ठिकाणी धावत असतात; परंतु यातील अनेक बसगाड्यांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे या बसगाड्या आगारातून निघाल्यानंतर मार्गावर मध्येच बंद पडतात. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १५ पेक्षा अधिक वेळा बसगाड्या मार्गावर बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. रविवारीही मंगरुळपीर आगाराची एमएच=४०, वाय-५६१२ क्रमांकाची मंगरुळपीर-शिर्डी ही बस आगारातून वाशिमकडे निघाली. तथापि, धानोरा खु. येथून थोडी पुढे आल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरावे लागले. सुदैवाने १० मिनिटांतच अमरावती आगाराची अमरावती-बार्शी ही बस तेथे आल्यानंतर प्रवाशांना त्यात बसून वाशिमकडे येणे शक्य झाले.

प्रवाशांसह एसटीच्या आर्थिक हानीची जबाबदारी कोणाची ?राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या मार्गावर बंद पडत असल्याने महत्त्वाचे शासकीय कामकाज, परिक्षेसाठी जाणाऱ्यांचे नुकसान होण्याची भिती असते, तसेच उपचारासाठी जाणाºया रुग्णाचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्याशिवाय बसफेरी बंद पडल्याने संबंधित आगाराचे आणि पर्यायाने एसटीचे आर्थिक नुकसानही होते. या सर्व गंभीरबाबींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या हानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

आमच्या आगारात ५५ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. तथापि, गिअर बॉक्समधील बिघाड किंवा इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- विनोद ईलामेआगार व्यवस्थापक,वाशिम

आमच्या आगारात ४६ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने गाड्यांत बिघाडोत आहेत. त्याशिवाय इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- अकिल मिर्झाआगार व्यवस्थापक, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी