शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम आगारात एसटी तिकीट मशिनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:32 IST

वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या वाशिम आगारात इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सचा तुटवडा असल्याने दररोज अनेक फेºया रद्द होत आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. या प्रकारामुळे वाशिम आगाराचे दररोज नुकसान होत असून चालक-वाहकांना मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे.वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे. पण मागील अनेक महिन्यापासून या मशिन बिघडल्याने वाहकांना कामावर जाता येत नाही. सुमारे ६० ते ६५ मशीन दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याचे वाहकांचे म्हणणे आहे. त्या अद्याप दुरुस्त होवून आल्या नाहीत. त्यातील ५ ते १० मशीन परत येतात. पण त्याही नादुरुस्त असतात. या स्थितीमुळे वाशिम आगारातील बसफेºया मंदावल्या आहेत. त्यामुळे दररोज १ हजार ते बाराशे कि.मी. प्रवास फेºयामुळे रोज हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याची वाहकांमध्ये चर्चा आहे. अनेकांना काम मिळत नसल्याने त्यांचे पगारावर फरक पडत असल्याची माहिती आहे. या स्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक मार्गावरील बसेस रद्द झाल्याने बाहेरच्या आगारांना उत्पन्न मिळत आहे. तसेच प्रवाशांना खाजगी वाहनांकडे धाव घ्यावी लागत आहे. या महिन्यात निवडणूक असून दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याने महामंडळाने तिकीट मशिन्सच्या तुटवड्यावर मार्ग काढणे आवश्यक ठरत आहे. वाशिम आगारात इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सचा तुटवडा असून यासाठी वरिष्ठांकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. अनेक मशिन्स नादुरुस्त होत असल्याने तुटवडा जाणवत आहे. आगामी निवडणूक व दिवाळीतील प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस फेºया नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- विनोद इलामे, आगारप्रमुख, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी