शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:07 IST

Washim News : सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत.

वाशिम : वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली असता, रिलीज आॅर्डर व आवश्यक ती कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत. या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्रांचे धाबे दणाणले असून, अनियमितता करणाºयांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही कृषी विभागाने दिला आहे.खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकºयांची गैरसोय तसेच फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांच्या पथकाने १९ मे रोजी वाशिम शहरातील तीन कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली. तपासणीदरम्यान १८ मे २०२१ रोजी विविध आठ कंपन्यांच्या पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्याचे आवश्यक दस्ताऐवजाची मागणी केली असता दस्ताऐवज उपलब्ध न झाले नाहीत. यामुळे सोयाबीनच्या १५४६ बॅगची (किंमत ४४.९० लाख) विक्री थांबविण्यात आली आहे. या साठ्यास विक्री बंदचे आदेश देतानाच, पुढील तीन दिवसात आवश्यक कागदपत्रे, रिलिज आॅर्डर दाखविण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला. २० मे रोजी मंगरूळपीर येथील चार कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता, रिलिज आॅर्डर व अन्य कागदपत्रे आढळून न आल्याने सोयाबीनच्या ३०० बॅग तसेच कापूस बियाण्याचे २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश दिले.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र