शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात निवासस्थानाअभावी अधिकाऱ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 15:50 IST

वाशिम: जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थानाचा अभाव आहे. शासकीय निवासस्थान नसल्याने काही अधिकारी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. तर काहींना मात्र अगदी परजिल्ह्यातूनही अपडाऊन करावे लागत आहे. 

ठळक मुद्देमुख्यालयात पदस्थापनेनंतर रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने मात्र उभारण्यात आली नाहीत.परिणामी काही अधिकाऱ्यांना भाड्याच्या घरांत वास्तव्य करावे लागत आहे. तालुकास्तरावरही हीच स्थिती असून, काही बडे अधिकारी या कारणामुळे परजिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत.

वाशिम: जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थानाचा अभाव आहे. शासकीय निवासस्थान नसल्याने काही अधिकारी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. तर काहींना मात्र अगदी परजिल्ह्यातूनही अपडाऊन करावे लागत आहे. वाशिम जिह्याची निर्मिती २० वर्षांपूर्वी झाल्यानंतर या ठिकाणी बहुतांश जिल्हा मुख्यालयांची स्थापना करण्यात आली. तथापि, या मुख्यालयात पदस्थापनेनंतर रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने मात्र उभारण्यात आली नाहीत. परिणामी काही अधिकाऱ्यांना भाड्याच्या घरांत वास्तव्य करावे लागत आहे. प्रत्यक्षात या अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळत असला तरी, त्यांना त्यापेक्षा अधिक रक्कम घरभाड्यापोटी द्यावी लागत आहे. विविध तालुकास्तरावरही हीच स्थिती असून, काही बडे अधिकारी या कारणामुळे परजिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत. अधिकारी आपले कर्तव्य बजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असले तरी, काही वेळा वाहतुकीचा खोळंबा आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे कार्यालयात वेळेवर दाखल होण्यास विलंब लागतो. तालुकास्तरावरील काही अधिकाऱ्यांना मात्र नाईलाजास्तव भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यातच अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांची अवस्था वास्तव्यालायक नसल्याने त्यांचा उपयोगही होऊ शकत नाही. या प्रकाराची दखल शासनाने घेऊन अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारून त्यांना मुख्यालयी ठेवण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

टॅग्स :washimवाशिम