शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर खाणेपिणे अन् झोपणे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:45 IST

Labours From other state in Washim परराज्यातील शेकडो कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देमळणीयंत्रधारक पश्चिम विदर्भात कामगार घेऊन येतात.मोठ्या संख्येने कामगार येथे या हंगामात दाखल होतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय असल्याने पोटापाण्याला आधार मिळावा म्हणून परराज्यातील शेकडो कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तथापि, निवाऱ्यासाठी आधारच नसल्याने उघड्यावरच खाणेपिणे करून रात्री मिळेल त्या जागेत उघड्यावर झोप घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय आहे. एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकरी करतात. या पिकाच्या काढणीतून मजुरांना चांगला मोबदलाही मिळतो. याचा फायदा घेण्यासाठी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील काही मळणीयंत्रधारक पश्चिम विदर्भात कामगार घेऊन येतात. त्या राज्यातही रोजगाराची वाणवा असल्याने मोठ्या संख्येने कामगार येथे या हंगामात दाखल होतात. टीचभर पोटासाठी थोडा पैसाअडका जुळविण्याच्या धडपडीसाठी हे कामगार गावोगाव भटकंती करून सोयाबीनची काढणी करतात. तथापि, त्यांना निवाऱ्यासाठी कसलाही आधार नसतो. त्यामुळे भूक लागली की उघड्यावर स्वयंपाक करून जेवण करणे, तसेच रात्रीला एखादी मोकळी पडिक जमीन शोधून त्यावरच ते झोप घेत आपले काम करताहेत. शेकडो किलोमिटरचा प्रवास करून कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी भटकत असलेल्या या कामगारांना पुरेशा प्रमाणात मजुरीसुद्धा मिळत नसल्याने त्यांची पुरती वाताहत होत असल्याचेही या कामगारांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.  (प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार