शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामांना मजुर मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:32 IST

वाशिम जिल्ह्यात १ लाख ७९ हजार २०६ जॉबकार्डधारक मजूरांची नोंद आहे. मात्र, दिवसभर राबराब राबूनही केवळ २०१ रुपये मजुरी हातात पडत असल्याने ‘रोहयो’च्या कामांकडे मजूरांनी पाठ फिरवली आहे.

ठळक मुद्दे१० हजारांवर कामे अपूर्णरोजमजूरी अल्प असल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात १ लाख ७९ हजार २०६ जॉबकार्डधारक मजूरांची नोंद आहे. मात्र, दिवसभर राबराब राबूनही केवळ २०१ रुपये मजुरी हातात पडत असल्याने ‘रोहयो’च्या कामांकडे मजूरांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, जिल्ह्यात विविध स्वरूपातील १० हजार २०० कामे अपूर्ण स्थितीत अडकली असून नवीन कामांचीही मागणी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबूतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे, रोपवाटिका तयार करणे,  शेततळे यासह इतर स्वरूपातील कामे जॉबकार्डधारक मजूरांकडून करून घेतली जातात. असे असले तरी दिवसभर राबूनही केवळ २०१ रुपये मजूरी मिळत असल्याने बहुतांश मजूरांनी ‘रोहयो’च्या कामांना नापसंती दर्शविली आहे. याशिवाय मस्टर भरण्यासह इतर जाचक अटींमुळे ‘वरकमाई’ होत नसल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा देखील ‘रोहयो’च्या कामांना विशेष प्राधान्य देत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कागदोपत्री जॉबकार्डधारक १ लाख ७९ हजार २०६ मजूरांची नोंद दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ३७ हजार ८५१ मजूरच कार्यरत आहेत. मजुर मिळत नसल्याने जुन्यापैकी तब्बल १० हजार २०० कामे अपूर्ण आहेत; तर नव्याने कामांची मागणी देखील नसल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बहुतांशी वांध्यात सापडल्याचे दिसून येत आहे. 

तालुकास्तरावरील अधिकाºयांना त्यांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात येणाºया विविध कामांची मागणी करण्यास सांगितले आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मजूरांकडूनही ‘रोहयो’च्या कामांना नापसंती दर्शविली जात असल्यानेच जुनी कामे तशीच प्रलंबित राहत आहेत.- सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम