मोरगव्हाण येथील कोकाटे कुटुंब आदर्श एकत्र कुटुंब म्हणून ओळखले जाते. पांडुरंग कोकाटे, आत्माराम कोकाटे,बद्रीनाराण कोकाटे कुटुंबीयांनी या वर्षी आपल्या घरी झाडाचा गणपती व मातीचा गणपतीची स्थापना केली आहे. या कुटुंबातील सदस्य तथा वृक्षप्रेमी विलास कोकाटे यांची मुलगी पूर्वजा कोकाटे हिने निसर्गशाळेच्या अंतर्गत घरच्या घरी रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेतील फळझाडांचा उपयोग करून या वर्षी झाडाचा गणपती बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला आहे. यात झाडे वाचवा-जीवन वाचवा, वृक्षतोड करू नका-जीवन धोक्यात टाकू नका, झाडे लावा,पर्यावरण वाचवा, मी झाडातच आहे असे संदेश देखाव्यामध्ये साकारले आहेत. तसेच अष्टविनायकांच्या नावांना आठ देशी झाडांची नावे देऊन वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. पूर्वजा कोकाटेला झाडाचा गणपती साकारण्यात निसर्ग शाळेचे संस्थापक आन्नासाहेब जगताप,गजानन कोकाटे,वृक्षप्रेमी विलास कोकाटे, विश्वास कोकाटे व कोकाटे कुटुंबीयांनी मार्गदर्शन केले.
कोकाटे कुटुंबीयांनी केली झाडाच्या गणपतीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:49 IST