शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:58 IST

वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले असून शासनाच्या मूळ उद्देशाला तडे गेल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात वाशिमवनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्या जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतीक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे. चालू खरीप हंगामात या अतिक्रमीत जमिनीवर खरीपातील पिकांची पेरणी झाल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्याकरिता महसूल विभाग व वनविभागाकडून काहीअंशी प्रयत्न देखील झाले; मात्र ते पूर्णत: निष्फळ ठरले आहेत. राखीव वनक्षेत्रावर वनविभागाचाच हक्क!वन संरक्षण कायद्यातील कलम २० नुसार राखीव वन क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रावर केवळ वनविभागाचाच हक्क राहत असून त्या जमिनीवर अन्य कुणाचेही कुठलेच अधिकार राहत नाहीत. असे असताना जिल्ह्यात काही लोकांनी वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करित तब्बल ४७९४.१४ हेक्टर राखीव वन क्षेत्रात अतीक्रमण केले आहे.

पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे; मात्र वैयक्तीक फायद्यासाठी काही लोकांनी राखीव वन क्षेत्रात अतिक्रमण करून शेती वहितीखाली आणली आहे. अशा संबंधित अतिक्रमणधारकांना व त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरूद्ध लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.- सुमंत सोळंकेउपवनसंरक्षक, वाशिम वनविभाग

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग