शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कारखेडा गाव झाले चुलमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 16:14 IST

गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे.

- बबन देशमुखलोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत सिलिंडर गॅस शेगडी पुरविण्यात आली. कारखेडा येथील जवळपास ४५० महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने आणि स्वखर्चातून सिलिंडर रिफिलिंग नियमित सुरू असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त, धुरमुक्त झाले आहे. महिला, गावकऱ्यांच्या एकजूटीतून कारखेडा गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला.चुलीच्या धुरापासून महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. धूर हा डोळ्यात जात असल्याने डोळ्याशी संबंधित आजारही जडतात. श्वास घेण्यास त्रासही जाणवते. चुलीच्या धुरापासून गोरगरीब महिलांची मुक्तता करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१८-१९ मध्ये पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलिंडर, शेगडी पुरविण्यात येते. ६०० कुटुंबसंख्या आणि अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कारखेडा येथेही उज्वला योजना राबविण्यात आली. या योजनेपूर्वी गावातील जवळपास १५० कुटुंबाकडे गॅस  सिलिंडर होते. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ४५० च्या आसपास महिलांना गॅस सिलिंडरचा लाभ मिळाला. सिलिंडर रिफिलिंगकरीता शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. तथापि, चुलीच्या धुरापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता या योजनेंतर्गतच्या महिला लाभार्थी या स्वखर्चातून रिफिलिंग करतात. कारखेडा येथे दर आठवड्यातून एक दिवस पोहरादेवी येथून गॅस सिलिंडर रिफिलिंगसाठी एक वाहन येते. त्यामुळे महिला लाभार्थींना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे. चुलमुक्तीसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. तत्कालिन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण, संजय महाराज, मनिष महाराज यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. गावात चुलमुक्त कार्यक्रम घेऊन महिलांचा सत्कारही केला होता.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना