शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जुलै उजाडतोय; तरी बांधकाम विभागाचा ‘मार्च एन्डिंग’ संपेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 09:55 IST

Washim News : ‘मार्च एन्डिंग’ संपत नसल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आर्थिक वर्ष संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. जुलै महिना उजाडत असतानाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा ‘मार्च एन्डिंग’ संपत नसल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत.मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला शासनाकडून विविध माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त हाेताे.  या निधीतून ग्रामीण भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. वाशिम जिल्हा परिषदेचे स्वनिधीचे अंदाजपत्रक जवळपास १० कोटींच्या  आसपास आहे. या निधीतून ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचविणे शक्यच नाही. स्वनिधीबरोबरच जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. बांधकाम विभागातर्फे ग्रामीण रस्ते, जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या विविध इमारती, निवासस्थान, जि.प. शाळेच्या वर्गखोल्या बांधकाम, दुरूस्ती, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांच्या इमारती यासह विविध प्रकारची बांधकामे केली जातात. सन २०१९-२० या वर्षात प्राप्त निधी खर्च करण्याची मुदत दोन वर्ष असून, ३१ मार्च २०२१ पूर्वी संपूर्ण निधी खर्च होणे बंधनकारक होते. प्राप्त निधी, खर्च झालेला निधी आणि शिल्लक निधी याचा ताळमेळ एप्रिल महिन्यापर्यंत बसविणे अपेक्षीत होते. जुलै महिना उजाडत असतानाही २०१९-२० या वर्षातील प्राप्त निधी किती खर्च झाला आणि अखर्चित किती निधी शासनाकडे कधी जमा केला, याचा लेखाजोखा बांधकाम विभागाकडे नाही. २८ व २९ जून रोजी बांधकाम विभागात देयकासाठी अनेकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना देयकासाठी झुलविल्या जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. 

माझ्याकडे बांधकाम विभागाचा प्रभार एप्रिल महिन्यात आला आहे. मार्चपूर्वीची मला कल्पना नाही.- ए.एम. खानप्रभारी कार्यकारी अभियंताबांधकाम विभाग जिल्हा परिषद

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग