लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे :जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या किन्हीराजा आणि खिर्डा येथे सुरू असलेल्या जुगारासह अवैध वरली मटक्यावर जऊळका पोलिसांनी शुक्रवार आणि शनिवारी धाडी टाकून वरली मटकाचे साहित्यासह जवळपास ५0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून एकूण ८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे किन्हीराजा येथे सुरू असलेल्या वरली मटक्यावर ७ जुलैच्या सायंकाळी धाड टाकून किन्हीराजा येथील राजु गोंडाळ यास रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून वरली मटकाचे साहि त्य व १८00 रुपये किमतीचा मोबाईल, तसेच रोख २३९0 रुपये असा एकण ४१९0 रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी राजु गोंडाळ यांच्यावर कलम १२ (अ) जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. त्याशिवाय खिर्डा येथे सुरू असलेल्या ५२ पत्याचा जुगारावर पोलिसांनी ८ जुलै रोजी धाड टाकुन ५२ पत्याचा ७ जणांना रंगेहाथ पकडले.ा त्यांच्याजवळून रोख १६00 रुपये व दुचाकीे मिळून ४४ हजार ६00 रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी ७ जणांवर जुगार अँक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदविला.
जऊळका पोलिसांची जुगार, वरली मटक्यावर धाड
By admin | Updated: July 9, 2017 09:43 IST