शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'जो बोले सो निहाल..’च्या जयघोषाने वाशिम नगरी दुमदुमली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:28 IST

वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सिंधी, सिख व ईतर समाजाचे सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जगाला अध्यात्मिकता, मानवता, भक्ती, सत्य, शिक्षण अशा मूल्यांचं महत्त्व पटवून देणाºया गुरूनानक देवजी यांची सिंधी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने गुरुद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजावट करण्यात आली होती. गेल्या आठवडाभर जयंतीनिमित्त गुरूग्रंथाचे पठण, सिंधी सुरीली शाम, आनंद मेळावा, रंगारंग कार्यक्रम, विविध खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धमार्चे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी केली.शुक्रवारला निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये विविध भजन, गाण्यांच्या तालावर तरूणांनी जल्लोष साजरा केला. जयंतीच्या दिवशी पूजा विधी नंतर लंगर म्हणजे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोकुलसेठ जीवनानी, धन्नुमल जीवनानी, चेतनदास चांदवाणी, बन्सीलाल बदलानी, चंद्रकांत जीवनानी, लालचंद आसुदानी, कृपालदास हरचंदानी, किरन बदलानी, विनोद बंसंतवानी, प्रभुदास जीवनानी, सुनिल जीवनानी, निलेश जीवनानी, पप्पू नेनवानी, दिलीप केसवानी, पमन नेभवानी, अनिल केसवानी, शंकर जीवनानी, सोनु चंदनानी, अमित जीवनानी, सुनिल सदनानी, अजय चांदवानी, बंटी तोलानी, प्रेम बदलानी यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक