शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू : दुसऱ्या दिवशीही मालेगावात कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 12:19 IST

१४ जुलै रोजी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून मालेगाव येथे १३ ते १५ जुलै या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात असून, दुसºया दिवशीही १४ जुलै रोजी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांमुळे मालेगावसह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत असून, मालेगाव शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात असून, तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्येच संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत. मालेगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील संदिग्ध रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टिंग सुरू करण्यात आली. पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेणे व त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे सध्या सुरू आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही, मालेगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, मोबाईल असोसिएशन, नगर पंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदींनी पुढाकार घेत १३ ते १५ जुलै दरम्यान जनता कर्फ्यूची हाक केली. त्यानुसार १३ जुलै रोजी शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. दुसºया दिवशीही १४ जुलै रोजी सकाळपासूनच मालेगाव शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. जनता कर्फ्यूला सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून आला. किराणा असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, सराफा असोसिएशन, कपडा असोसिएशन, कृषी व्यवसायिक संघटना, स्टेशनरी व्यवसायिक, भाजीपाला यासह मालेगावकर, नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक यामध्ये सहभागी झाल्याने दुसºया दिवशीही जनता कर्फ्यू १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

शिरपूर येथेही जनता कर्फ्यूमालेगाव तालुक्यातील शिरपूर येथेही व्यापाऱ्यांनी १४ व १५ जुलै रोजी जनता कर्फ्यूची हाक दिली. पहिल्या दिवशी जवळपास ६५ टक्के दुकाने बंद होती. शिरपूर येथे जनता कर्फ्यूला १०० टक्के प्र्रतिसाद मिळू शकला नाही.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या