शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोषण पंधरवडा अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:25 IST

आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथेही हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, येत्या २२ मार्चपर्यंत चालणाºया या कार्यक्रमांतर्गत बालक, युवक व महिला जनजागृतीच्या उद्देशाने पौष्टिक पोषण आहाराबाबत मार्गदर्शन, कुपोषित बालकांची तपासणी तसेच गरोदर माता आणि विद्यार्थी-पालकांच्या सभा व रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.   महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाºया महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आसेगाव येथील अंगणवाडी क्रमांक १, २ आणि ३ मध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मंगरुळपीर येथून प्रभात फे री काढण्यात आली. त्यानंतर ९ मार्चला अंगणवाडी केंद्रांत पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली, १० मार्चला कुपोषित बालकांची तपासणी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले, ११ मार्चला लाभार्थींचे पालक व कुटुंबांतील सदस्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले, तर १२ मार्चला किशोरी आणि गरोदर मातांची सभा घेऊन त्यांना महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत १३ मार्चला सुदृढ बालक स्पर्धा आणि सभा, १४ मार्चना पौष्टिक पाककृती पोषण संमेलन, १६ मार्चला महिला-पुरुष शेतकरी सभा, १७ मार्चला पोषण रॅली, १८ मार्चला युवक सभा, १९ मार्चला ग्रामस्थांची सभा, २० मार्चला किशोरींच्या रक्ताल्पतेची तपासणी, २१ मार्चला सायकल रॅलीने जनजागृती, तर २२ मार्चला ग्रामपंचायतच्या सभा घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका लता चौधरी यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका अजिजा अहमद परवेज पठाण, जैबुन्निसा अब्दुल रशिद शेख, नलिनी प्रकाश भिसे, सायमा तहसीन परवेज, मदतनीस त्रिशीला ठोंबरे, आशा सेविकारईसा खानम शेख मुसा आणि निर्मला भिकाजी भगत या परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिम