शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांत १९ शिक्षक रूजू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:42 IST

वाशिम : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्वावर भरण्यात आली असून, एकूण १९ शिक्षक संबंधित शाळांवर रूजू झाले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा म्हणून जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांतर्फे शाळांची स्थापना केली जाते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण या शाळांमधून दिले जाते. खासगी शाळांच्या ...

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची गैरसोय टळली : सहा वर्षांपासूनचा तिढा सुटला

वाशिम : जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्वावर भरण्यात आली असून, एकूण १९ शिक्षक संबंधित शाळांवर रूजू झाले आहेत. 

विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा म्हणून जिल्हा परिषद, नगर परिषद व महानगर पालिकांतर्फे शाळांची स्थापना केली जाते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण या शाळांमधून दिले जाते. खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील शिक्षण दर्जेदार नसते, अशी ओरड नेहमीच होत असते. या पृष्ठभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्येही भौतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे या शाळांवर शिक्षकांची काही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांवर पदोन्नती, समायोजन व आंतरजिल्हा बदली या प्रक्रियेतून शिक्षकांची पदे भरली जात आहेत. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची पदे गत सहा वर्षांपासून भरण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने तासिका तत्वावर १९ पदांना मान्यता दिल्याने शिक्षक भरतीची कार्यवाही पुर्णत्वाकडे नेण्यात आली. जिल्ह्यात वाशिम, कामरगाव व विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र यासह महत्त्वाच्या विषयाच्या शिक्षकांची १९ पदे तासिक तत्वावर भरण्यात आली. चार दिवसांपूर्वी सर्व शिक्षक रूजू झाल्याने तुर्तास तरी विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. 

वाशिम जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रशासकीय कार्यवाही केली असून, एकूण १९ शिक्षकांची तासिका तत्वावर नियुक्ती केली आहे. सदर शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रूजू झाले आहेत. 

- अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) वाशिम.