शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:50 IST

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

प्रशासनाची उदासिनता : सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गटागटाने शेती करणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादित केले जात आहे. मात्र, त्यास जोपर्यंत पुरेसे ग्राहक मिळत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नाही. ही बाब लक्षात घेवून मध्यंतरी ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला, विषमुक्त अन्नधान्य विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांकडून मागणी नोंदवून वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्य शेतमालाचे उत्पादन घेण्यास इच्छुक २८ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून सुमारे १२०० शेतकरी त्यांच्या ५६० हेक्टर शेतीवर सेंद्रिय भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी सज्ज आहेत. सावरगाव जिरे, काजळांबा, खरोळा, डही यासारख्या काही गावांमधील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतमालाचे उत्पन्न काढले जात आहे. मात्र,  तुलनेने अधिक खर्च लागत असलेल्या सेंद्रिय शेतीतून उत्पादित शेतमाल विक्रीसाठी संबंधित शेतकºयांना अद्यापपर्यंत वाशिम जिल्ह्यात कुठेच हक्काची बाजारपेठ अथवा पुरेसे ग्राहक मिळालेले नाहीत. त्यानुषंगाने ‘आत्मा’च्या वतीने शेतकरी व ग्राहकांचा थेट संपर्क करून देत वाजवी दरात सेंद्रिय शेतमाल विक्रीची बाजारपेठ उभारण्यासाठी तद्वतच सेंद्रिय शेतमाल खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांची यादी तयार करण्यात आली. त्यास नागरिकांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, आॅनलाईन नोंदणी केलेल्या एकाही ग्राहकास सेंद्रिय शेतमाल विकत घेण्यासंबंधी कुणीच संपर्क साधत नसून इच्छूक ग्राहकांसाठी सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दाही सद्या थंडबस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमvegetableभाज्याagricultureशेती