शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अधिग्रहित विहीरधारकांचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:34 IST

मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमित झनक यांनी सबंधीत तहसीलदार यांना ऊन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत जलसेवा करणाºया शेतकरी मंडळीच्या या रखडलेल्या रक्कमबाबत संताप व्यक्त करून तातडीने ही रखडली देयके अदा करण्याचे निर्देश दिले होते. त्याची दखल प्रशासनाने घेऊन विहीर, कूपनलिका अधिग्रहीत केलेल्या शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. मालेगाव पंचायत समितीत ऊन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी ऊपाययोजनाचे पूर्व नियोजन आणि आराखडा तयार करण्यासाठी सभा बोलावीली होती. सदर सभेला पं.स.सभापतीसह लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावोगावची सरपंच, ऊपसरपंच आणि पदाधिकारी मंडळी आवर्जून उपस्थित होती. यावेळी मालेगावात  चंद्रभागाबाई वाझुळकर,  सुनिता बबनराव मिटकरी, रूपाली मानवतकर, नम्रता घुगे, सुधाकर मुळे, दयानंद व्यवहारे, कृष्णा देशमुख, सिंधुबाई चव्हाण, रेखाबाई मेटांगे, लक्ष्मी अवचार, ओम चतरकर, सदाशिवराव देशमुख, कैलासराव आंधळे, नामदेवराव वानखेडे(माऊली)सह अनेक सरपंच मंडळीनी त्यांंच्या गावात पाणी टंचाईच्या काळात अवघ्या ३०० ते ४०० रुपये रोजाच्या खर्चात शेतकºयांच्या विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करून पाणी टंचाई निवारण केले. अनेकांनी टँकरनेही अहोरात्र पाणी पुरवठा केला. मात्र  या सेवेपोटी ठरलेली रक्कम मिळण्यास प्रचंड विलंब झाला होता. शेतकºयांच्या या समस्येवर अमित झनक यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना धारेवर धरून तातडीने अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरी, कूपनलिकांची रक्कम शेतकºयांना अदा करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर मालेगाव पंचायत समितीने सबंधीत विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या शेतकºयांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :washimवाशिमAmit Jhankअमित झनक