शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरी, शेततळे धारकांच्या शेतीत होणार फळबाग लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:29 IST

प्रकल्प सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादक संचालकांनी २० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: राज्यशासनाचा कृषी विभाग फळबागांचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने ज्या भागांत रोहयो अंतर्गतच्या विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्या भागांतील लाभार्थींना फळबाग लागवडीस प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या संदर्भात कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन संचालकांनी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याच्या सुचना सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना २० आॅगस्ट रोजी पत्र पाठवून दिल्या आहेत.राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅगस्ट रोजी राज्यातील फळबाग लागवडीच्या आढावा घेण्याबाबत सभा पार पडली. ज्या भागांत रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील शेततळ्यांची कामे पूर्ण केली आहेत. त्या शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश त्या सभेत देण्यात आले. यासाठी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी फळबाग लागवडीसाठी तालुकानिहाय प्रकल्प सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादक संचालकांनी २० आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत होणार लागवडराज्याच्या कृषी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मागेल त्याला शेततळे अंतर्गत शेततळे पूर्ण करणाºया, तसेच रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी पूर्ण करणाºया शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केल्यानंतर त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असून, प्रस्ताव देणाºया शेतकºयाच्या शेतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कृषी विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती