शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सिंचन विहिरींचा अनुशेष शेतक-यांच्या मुळावर!

By admin | Updated: April 9, 2016 01:32 IST

वाशिम जिल्ह्यात १३५८ विहिरी प्रलंबित, १0६९ रद्द.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडनिसर्गाच्या दुष्टचक्रामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी पार गलितगात्र झाला आहे. दुष्काळी परिस्थितीतही पीक उत्पादनावर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत सापडू नये, या विचाराने शासनाने काही योजना अस्तित्वात आणल्या. यामध्ये नवीन विहिरी, विहीर पुनर्भरण, सिंचन विहिरी, विहीर दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. जिल्ह्यात अजूनही १३५९ विहिरींचे अर्ज धूळ खात आहेत. शेतकर्‍यांना विविध योजनांसाठी विहिरी मंजूर केल्या असल्या, तरी विहीर खोदण्यासाठीच्या अनुदानाकरिता पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार ८00 विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मागील सात ते आठ वर्षांत त्यापैकी १ हजार ६९ विहिरी रद्द करण्यात आल्या, तर ५ हजार तीनशे त्र्याहत्तर विहिरी पूर्ण करण्यात आल्या असून, एक हजार तीनशे ५८ विहिरी अद्यापही अपूर्ण आहेत. जिल्हास्तरावरून घेतलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात धडक सिंचन, नरेगाच्या विहिरीसह विहीर दुरुस्ती अंतर्गत एकूण ३ हजार दोनशे ५२ विहिरींची कामे सुरू आहेत. या विहिरींवर मजुरीसाठी ५४ कोटी ५३ लाख ७९ हजार रुपयांचा, तर बांधकाम साहित्यासाठी ३३ कोटी ८८ लाख १५ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात अर्थात २0१६-१७ मध्ये मजुरांसाठी ९७.३३ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला. या ३ हजार २५३ विहिरींच्या कामांना मंजुरी दिल्यापासून आजवर मजुरीसाठी ३१ कोटी ४१ लाख ९५ हजार, तर बांधकाम किंवा इतर साहित्यासाठी ५ कोटी ५३ लाख सात हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.