शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहस्त्र सिंचन योजनेतील ४,८३४ विहिरी अद्याप अपूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:38 IST

७ जुलैपर्यंत त्यापैकी उण्यापूऱ्या  ८७९ विहिरींचेच काम पूर्ण झाले असून ४,८३४ विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देगेल्या दोन ते तीन वर्षांत सहा हजार विहिरींपैकी केवळ ८७९ विहिरीच पूर्ण झाल्या. ४,८३४ विहिरींची कामे अद्याप अपूर्णावस्थेत रखडली आहेत.पावसाळा सुरू असल्याने ही कामे आणखी तीन ते चार महिने सुरू देखील होणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे सहा हजार विहिरी मंजूर झाल्या. मात्र, ७ जुलैपर्यंत त्यापैकी उण्यापूऱ्या  ८७९ विहिरींचेच काम पूर्ण झाले असून ४,८३४ विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता पावसाळा सुरू असल्याने कामे पूर्ण करणे अशक्य असल्याने विहिर पूर्णत्वाची प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मंजूर सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, शारिरिकदृष्ट्या विकलांग, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, याप्रमाणे लाभार्थींची निवड करण्याचे निश्चित झाले होते. दरम्यान, लाभार्थींची निवड ग्रामसभेत करण्याचे निश्चित झाल्यानंतर संबंधितांकडून २५ डिसेंबर २०१६ पर्यंत पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार, शेकडो लाभार्थींनी अर्ज केले. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांत सहा हजार विहिरींपैकी केवळ ८७९ विहिरीच पूर्ण झाल्या असून उर्वरित ४,८३४ विहिरींची कामे अद्याप अपूर्णावस्थेत रखडली आहेत. सद्या पावसाळा सुरू असल्याने ही कामे आणखी तीन ते चार महिने सुरू देखील होणार नाहीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; विहिरी पूर्ण करण्याचे निर्देश!सहस्त्र सिंचन विहिर योजनेंतर्गत जिल्ह्यातील अपूर्ण असलेल्या ४,८३४ विहिरींप्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून अपूर्ण असलेल्या विहिरी तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींसोबतच इतर प्रशासकीय यंत्रणांची मदत घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना