शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:38 IST

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे. या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या चार गावांतील २८० हेक्टर क्षेत्रातील एका हेक्टर क्षेत्रात या प्रकल्पावरून पाण्याचा थेंबही मिळत नाही. उलट लाभ क्षेत्रात असल्याने जमिनीच्या खरेदीविक्री मात्र मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने या क्षेत्रातील शेतकºयांनी लाभ क्षेत्रातून जमीन वगळण्याचीच मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत गेल्या २० ते २५ वर्षांपूर्वी धानोरा भुसे येथे सिंचन प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पासाठी काही शेतकºयांची जमीनही अधिग्रहित करण्यात आली प्रकल्पाच्या व्याप्तीनुसार लाभक्षेत्र निश्चित करण्यात आले आणि लाभक्षेत्रातील शेतकºयांना पाणी सोडण्यासाठी लाखो रुपये खर्चून कालव्याची बांधणीही करण्यात आली; परंतु हा प्रकल्प कार्यान्वित झाला तेव्हापासून आजवरही या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या चार गावांतील शेतकºयांच्या २८० हेक्टर क्षेत्राला थेंबभरही पाणी या प्रकल्पातून आजवर मिळाले नाही. शेतकºयांनी त्यांची ही समस्या कित्येकदा प्रशासनापुढे मांडली; परंतु धानोरा भुसे येथील शेतकरी वगळता इंझोरी, दापुरा, जामणी व उंबर्डा (लहान) या चार गावांतील एकाही शेतकºयाची समस्या अद्याप सोडविण्यात आलेली नाही. उलट लाभ क्षेत्रात जमीन असल्याने या शेतकºयांना जमीनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाभ क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारासाठी लागणाºया मुद्रांकाचे मुल्य दुप्पट असल्याने शेतकºयांना जमिनीचे व्यवहार करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एक, तर कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडावे किंवा नामधारी असलेले लाभक्षेत्र रद्द करून जमिनी लाभक्षेत्रातून वगळाव्या, अशी मागणीच उपरोक्त चारही गावातील शेतकºयांनी केली आहे.लघू सिंचन विभागाची शुन्य कार्यवाहीगेल्या अनेक वर्षांपासून धानोरा भुसे प्रकल्पांतर्गत येणाºया शेतकºयांची सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी होत आहे. यासाठी लघू सिंचन विभागाने कालव्याची बांधणीही केली आहे; परंतु अद्याप हा कालवा प्रकल्पातील पाण्याने ओलासुद्धा झाला नाही. त्यामुळे एवढा खर्च केला तरी कशासाठी, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लघू सिंचन विभागाने आजवर शेतकºयांच्या मागणीची दखलही का घेतली नाही, हा प्रश्नही येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प