शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या ३,८१७ कामांमधून ३३,५३२ हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 13:55 IST

लसंधारणाच्या ३ हजार ८१७ कामांमधून ३८ हजार ८५८ हेक्टर टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांकडे विशेष लक्ष पुरविले. त्याची अपेक्षित फलनिष्पत्ती झाली असून जलसंधारणाच्या ३ हजार ८१७ कामांमधून ३८ हजार ८५८ हेक्टर टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामाध्यमातून ३३ हजार ५३२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली असून चालू रब्बी हंगामातील पिकांच्या प्रश्न निकाली निघाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची १९३९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर २५.३३ कोटी रुपयांचा खर्च झाला असून २४ हजार ९०६ हेक्टरवरील पिकांच्या सिंचनाची सोय झाली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४३५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. त्यावर ६.६२ कोटी रुपये खर्च झाले असून १८०१ हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली आली आहे. समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्गअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपातील ८० शेततळे तयार करण्यात आले. त्यासाठी कुठलाही निधी खर्च झालेला नाही.या माध्यमातून ३०८५ हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली आली आहे. वॉटरकप २०१९ या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची ५२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी केवळ २७ लाखांचा खर्च झाला असून १३१६ हेक्टर शेतजमिनीवरील पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. सुजलाम्-सुफलाम् अभियानाअंतर्गत २९७ कामांमधून २१६८ हेक्टर, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारच्या १४ कामांमधून २५४ हेक्टर जमिन सिंचनाखाली आली असून ३८ हजार ८५८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.१७.९४ कोटींची बचतसमृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान पूर्ण झालेल्या जलसंधारणाच्या ८० कामांच्या माध्यमातून ३५८८.२२ लक्ष घनमीटर उत्खनन झाले असून १७.९४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

टॅग्स :washimवाशिम