शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अडिच कोटीच्या रस्ता कामात नियमांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 17:17 IST

या कामात नियमांना बगल देण्यात येत असून, निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुमार होत असल्याचे दिसते. 

लोकमत न्यूज नेटवर्कपोहा (वाशिम) : कारंजा तालुक्यातील पोहा ते वालई या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तथापि, या कामात नियमांना बगल देण्यात येत असून, निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुमार होत असल्याचे दिसते. पोहा ते वालई या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २.५० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर २९ डिसेंबर २०१८ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या रस्ता कामाचे भुमीपुजन करण्यात आले. अंदाजपत्रकानुसार या रस्यासाठी २४७.०७ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, या रस्त्याचे काम २० डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. या रस्ता कामाचे कंत्राट अकोला येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार या रस्त्याच्या कामात निर्धारित आकाराची खडी वापरून दबाई करणे आवश्यक आहे; परंतु कंत्राटदार विहिरीच्या खोदकामातून निघालेले निकृष्ट दर्जाचे गौणखनिज या कामासाठी वापरत आहे. यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार होत असून, दळणवळणाच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीचा यामुळे अपव्यय होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्ताकामाची नियमित पाहणी करून कंत्राटदाराला रस्त्याचा दर्जा चांगला करण्याबाबत समज देणे अपेक्षीत आहे; परंतु तसा प्रकार येथे होत नसल्याने कंत्राटदार नियमांना बगल देऊनच काम पूर्ण करीत आहे.  

रस्ता कामात निकृ ष्ट दर्जाचे गौण खनिज आढळल्यानंतर आम्ही कंत्राटदाराला समज देऊन त्यापैकी काही गौणखनिजाच्या ट्रीप रद्दही केल्या आहेत. अद्यापही नियमांचे पालन होत नसेल, तर कंत्राटदाराला कडक इशारा देऊन काम बंद करण्यात येईल. -जे. व्ही. कांबळेकनिष्ठ अभियंतासा.बां. उपविभाग कारंजा

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग