शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात शिशू आहार वाटपात गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 14:18 IST

मालेगाव तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बालकांना हा आहार मिळालाच नसल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : अंगणवाडीतील तीन वर्षाखालील बालकांचे कुपोषण होऊ नये म्हणून वर्षांतील ३०० दिवस रोज ३०० उष्मांक आहाराची शासनाने तरतूद केली; परंतु मालेगाव तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बालकांना हा आहार मिळालाच नसल्याची माहिती आहे. त्यामुळ तालुक्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसत आहे.मालेगाव तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत १८० अंगणवाड्या आहेत. तालुक्यातील अंगणवाड्यांना महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटीव्ह कन्झूमर्स फेडरेशन लि . मुंबई यांनी मे आणि जून या दोन महिन्यातील ५० दिवसासाठी अंगणवाडीनिहाय कच्च्या धान्याचा पुरवठा केला. यामध्ये मसूर डाळ, मूग डाळ, मिरची, हळद, सोयाबीन तेल, चवळी, मटकी आदी धान्यांचा समावेश आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांतर्गत येणाºया सहा महिने ते ३ वर्षांपर्यंतच्या लाभार्थी बालकांना या धान्याचे वितरण अपेक्षीत होते; परंतु शेकडो लाभार्थी बालकाच्या घरापर्यंत हे धान्य पोहोचलेच नाही. काही अंगणवाडी केंद्रात बालक कमी असतानाही तेथील सर्व बालकांना शिशू आहार मिळाला नाही. बहुतांश पालकांना तर या पोषण आहाराची थोडीही कल्पना नाही. तथापि, लाभार्थी बालकांना धान्य वितरण केल्याची नोंद कागदोपत्री करण्यात आली आहे. अनेक बालकांना हा आहार मिळाला नाही तर, काहींना अर्धाच आहार वाटप केल्याची माहिती आहे.शासनाकडून कुपोषण मुक्तीसाठी विविध योजना राबविण्यात येत असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लाभार्थींपर्यत त्या योजनाच पोहोचत नाहीत. यामुळे शासनाच्या योजनेचा उद्देश असफल ठरत आहे.त्यामुळे मालेगाव तालुक्यातील मे आणि जून या दोन महिन्यातील शिशू आहार वितरणाची सखोल चौकशी केल्यास पालकांच्या भेटी घेतल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता असून, पोषण आहाराची चौकशी करण्याची मागणी पाककवर्गाकडून होत आहे. प्रभारी अधिकाºयांच्या अनुपस्थितीचा परिणाममालेगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने मंगरुळपीर येथील बालविकास प्रकल्प अधिकाºयांकडे मालेगावचा प्रभार देण्यात आला होता; परंतु सदर अधिकारी या ठिकाणी ठरल्यानुसार उपस्थित राहत नव्हते. त्याबाबत वरिष्ठस्तरावर तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहार वितरणात गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त होत आहे. तथापि, या प्रकाराच्या चौकशीनंतरच वास्तव समोर येऊ शकणार आहे. दरम्यान, आता मंगरुळपीरच्या अधिकाºयांकडून येथील प्रभार काढून स्थानिक विस्तार अधिकारी अनिल उलेमाले यांच्याकडे बालविकास प्रकल्प अधिकाºयांचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे.

 

मालेगाव तालुक्यात शिशू पोषण आहार वितरणात गैरप्रकार झाला असेल किंवा लाभार्थींना नियमानुसार आहार वितरण झाले नसेल, तर त्याची चौकशी करून. संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.-मदन नायकप्र. महिला व बालकल्याण अधिकारीजि.प. वाशिम आमच्या येथील मुलांना नियमानुसार अंगणवाडीतून पोषण आहार मिळत नाही. मागील महिन्यात सर्व साहित्याचे केवळ एक पाकिट मिळाले आहे. याबाबत संबंधित अधिकारीही काही बोलण्यास तयार नसतात. त्यामुळे मनता संभ्रम निर्माण झाला आहे.-शंकर अहिर (पालक)मालेगाव

टॅग्स :washimवाशिम