शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

 ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 13:51 IST

पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र १२ व १३ डिसेंबरला चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ठराविक २० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी पथक पोहचलेच नसल्याची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने १६ डिसेंबरला प्रकाशित वृत्ताच्या माध्यमातून उघड केली. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या.याशिवाय चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे १७, १८, २०, २१, २६ आणि २७ डिसेंबरला नियोजित सर्व ग्रामपंचायतींमध्ये चौकशीसाठी पथक पोहचले असून आता शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली. या ७ ग्रामपंचायतींमध्ये होणार उद्या चौकशी१२ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणाºया ‘रोहयो’ कामांच्या चौकशी प्रक्रियेदरम्यान ठराविक त्या-त्या तारखेस १० पथकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात आली. आता ३१ डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डव्हा, खिरडा, शिरसाळा, अमानी, झोडगा बु., केळी आणि गिव्हा कुटे या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांची चौकशी होणार आहे.

मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत क्षेत्रात सप्टेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार, १२ डिसेंबरपासून १० पथकांमार्फत चौकशीस सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी पूर्ण झाली असून ३१ डिसेंबरला उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत