शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; आतापर्यंत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह                                                                                   

By दिनेश पठाडे | Updated: September 6, 2022 16:12 IST

वाशिम जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराने शिरकाव केला आहे.

वाशिम : कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. हे चित्र सुखद असतानाच आता दुर्मिळ आजार असलेल्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन रुग्णांचे स्क्रब टायफसचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाशिम जिल्ह्यात कारंजा शहरातील ४५ वर्षीय व मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका ५० वर्षीय व्यक्ती अशा दोघांना गत महिन्यात स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले होते. एकाचा १७ ऑगस्ट तर दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल २६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आढळून आला. 

या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना स्क्रब टायफसची लक्षणे असल्याने त्यांचे रक्तजल नमुन्याची खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विविध आजाराची लक्षणे असलेल्या १०० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. त्यातील ७५ नमुने डेंग्यू व चिकनगुनिया आजाराच्या निदानासाठीची होते. तर १५ नमुने स्क्रब टायफस आजाराच्या तपासणीसाठी घेण्यात आली होती. १२ जणांना डेंग्यू, ४ जणांना चिकनगुनिया तर २ दोन जणांना स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा एक जंतु संसर्ग आजार असून या आजाराचे लक्षणे हे देखील चिकनगुनिया सारखे असतात. हा आजार जलदगतीने वाढणारा आहे. योग्य वेळात आजारावर निदान झाले नाही तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे स्क्रब टायफस होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आवाहन दरम्यान, उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील 'ओरिएंशिया सुसूगामुशी' नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास ८ ते १० दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.पी. बोरसे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय