शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची धांदलघाई; वाहतूक खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:28 IST

वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी कामाला वेग दिला आहे. यामुळे महामार्गावर एकाचवेळी २ ते ३ मशीनचा वापर होत असून या मार्गावर सुरू असलेल्या वाहतूकीला त्याचा फटका बसत आहे. रविवारी मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांपूर्वीपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा आणि कारंजा ते मानोरा, अशी राष्ट्रीय महामार्गाची कामे करण्यात येत आहेत. ही कामे कार्यारंभ आदेशानंतर २ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. निविदा प्रक्रियेतच तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यात पावसाळ्यात वारंवार या कामांत खोळंबा निर्माण झाला, तर त्यानंतर सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस, तसेच आॅक्टोबरच्या अखेरनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाचा जोर राहिल्याने या कामांत पुन्हा खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे कामे रखडली. आता या कामांसाठी खुप कमी कालावधी उरला असल्याने ही कामे पूर्ण करण्याची घाई संबंधित कंत्राटदार कंपन्या करीत आहेत. यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ आणि मशीनचा वापर करून तातडीने खोदकाम आणि समतलीकरणाचे कामकंत्राटदारांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे एका बाजुने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एकाचवेळी दोन्ही प्रकारची कामे सुरू असल्याने या मार्गांवर वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. ठिकठिकाणी जेसीबी, पोकलन मशीन गौणखनिज पसरविण्याचे काम करण्यात येत असल्याने या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांसह, मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, खासबी प्रवासी वाहने रस्त्यावर उभी राहत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या सर्वच कामांवर हा प्रकार पाहायला मिळत असून, रविवार १७ नोव्हेंबर रोजी वाशिम-मंगरुळपीर दरम्यान या प्रकाराचा अतोनात त्रास प्रवासी आणि वाहनधारकांनाही सहन करावा लागला. आता आणखी चार ते पाच महिने तरी हा त्रास कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग