शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 17:28 IST

International Yoga Day : ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

वाशिम : जिल्हा प्रशासन व विविध योग संघटनांच्या सहकार्याने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ७ ते ८.३० वाजेदरम्यान आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे होते.

यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकात उप्पलवार, योग केंद्राचे संचालक रामनारायण छापरवाल, लेखाधिकारी युसुफ शेख, योग अभ्यासिकेच्या पुष्पलता अफूने, गाईड जिल्हा संघटक प्रीती गोल्हेर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्यक्ष व ऑनलाईन स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना छापरवाल यांनी योग दिनाबद्दल शपथ दिली. यावेळी मानकर यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्व व फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तांगडे यांनी योग हा आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण घटक असल्याचे सांगितले. त्यानंतर योग चिकित्सक तेजस्विनी माणिकराव, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय चव्हाण, पतंजली युवा भारतीचे सहजिल्हाध्यक्ष आशिष जामकर यांनी आयुष मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार योग प्रात्याक्षिके घेतली.आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी संजय पांडे, क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरशीकर, संतोष कनकावर, संतोष भेंडेकर, सुरज भड, भारत वैद्य, कलीम वेब मिर्झा, विनायक जवळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन