शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम  जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:01 IST

१० हजार ६४ शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून ८१ लाख ४१ हजार ८८ रुपयांची नुकसान भरपाई पीकविम्यापोटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवेळी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी उडिद आणि मुग या पिकाचा विमा भरणाºया १० हजार ६४ शेतकऱ्यांना अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनीकडून ८१ लाख ४१ हजार ८८ रुपयांची नुकसान भरपाई पीकविम्यापोटी देण्यात आली असून, शेतकºयांच्या खात्यात पीकविम्याची रक्कमही जमा करण्यात येत आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घालत शेतीपिकांचे अतोनात नुकसान केले. यात पीक विमा भरणाºया शेतकºयांच्या नुकसानाची पाहणी प्रशासनातर्फे करण्यात आली आणि कृषी विभागाने या संदर्भातील अहवाल कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविला होता. जिल्ह्यात गतवर्षीच्या अर्थात २०१९च्या खरीप हंगामात २ लाख ९५ हजार २९० शेतकºयांनी २ लाख ४ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ६२ लाख ९३ हजार २१४ रुपये पिकविम्यापोटी भरले होते. त्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पीकविमा मंजूर होण्याच्या मागणीसाठी ८६ हजार ४३ शेतकºयांनी पीक विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अर्ज केले होते. या अर्जांच्या आधारे कृषी विभाग व पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई म्हणून मदत देण्यासाठी केलेल्या आकडेमोडीनुसार अंदाजे ३६९ कोटी ९८ लाख ४९ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, जिल्ह्यातील २७ हजार २४ शेतकºयांनी १२ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रातील उडिद आणि मुग या पिकांच्या विम्यापोटी ४७ लाख ५७ हजार ४४२ रुपये भरले होते. त्यापैकी १० हजार ६१ शेतकºयांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

खरिप हंगामात अवकाळी पावसामुळे मुग आणि उडीद पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी पीक विमा भरणाºया शेतकºयांना विम्याची रक्कम मंजुर झाली असून त्याचे वितरण थेट खात्यावर करण्यात येत आहे. तसे मॅसेजची पाठविले आहेत.- ज्ञानेश्वर बोबडेजिल्हा समन्वयक, कृषी पीक विमा कंपनी , वाशिम

भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्यावतिने पीक विमाधारक शेतकºयांना उडीद आणि मुग पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ८१ लाख ४१ हजार रुपयांची भरपाई मंजुर केली आहे. यासाठी दहा हजार ६१ शेतकरी पात्र असून त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे.- एस.एम. तोटावारजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा