शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:26 IST

अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले.

वाशिम : प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह समाजकल्याण विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले. समाजकल्याण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीस दिरंगाई, वित्तीय अनियमितता यासह कृषी, पंचायत, शिक्षण विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर जिल्हा परिषद सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या पीठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, उस्मान गारवे यांनी समाजकल्याण विभागातील विविध योजनांमधील प्रशासकीय दिरंगाईबाबत संबंधित अधिका-यांना धारेवर धरले.झेरॉक्स मशिन व अन्य काही योजनांचे प्रस्तावास दिरंगाई झाल्याचा जाब विचारला असता, सदर फाईल वित्त विभागात असल्याचे उत्तरे संबंधित अधिका-यांनी दिले. यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी जोशी यांना विचारणा केली असता, वित्त विभागाकडून दिरंगाई होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात संभ्रम निर्माण केल्याबद्दल तसेच दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश हर्षदा देशमुख यांनी दिले. समाजकल्याण अधिकारी हे वाशिमला नियमित येत नसल्याचा मुद्दा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उपस्थित केला. समाजकल्याण अधिका-यांकडून यवतमाळ येथील प्रभार काढून पूर्णवेळ वाशिम येथेच ठेवण्यात यावे, असा ठराव यावेळी घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीवरून उस्मान गारवे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड आदींनी प्रश्न उपस्थित केला असता, २५०० पैकी ६५० विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बँक खात्याची दुरुस्ती करीत त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याची माहिती अधिका-यांना दिली. समाजकल्याण विभागाने १० दिवसांपूर्वीदेखील हीच आकडेवारी सादर केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासकीय दिरंगाई करणारे गटशिक्षणाधिकारी तसेच समाजकल्याण विभागाच्या संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषी विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शासन परिपत्रक व निर्णयाचे वाचन, पाणीटंचाई, दुष्काळसृदश परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ताथोड, चक्रधर गोटे, शंकरराव बोरकर, विकास गवळी, उस्मान गारवे, सचिन रोकडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.आठ महिन्यांपासून चार कोटी रुपये पडूनशिष्यवृत्ती योजनेंतर्गतचे चार कोटी रुपये गत आठ महिन्यांपासून बँकेत पडून असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सदर चार कोटी रुपये हे चालू खात्यात असल्याने त्याचे व्याजही जिल्हा परिषदेला मिळू शकले नसल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. शिष्यवृत्ती योजनेसंदर्भातील रकमेबाबत समाजकल्याण विभागाने बँक अचानक का बदलण्यात आली, याचा जाब चक्रधर गोटे यांनी विचारला. कुणाच्या परवानगीने बँक खाते बदलण्यात आले असा सवाल विचारत याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिले.