शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 11:53 IST

राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी तसेच या कामांवर असलेले उपकंत्राटदार, मजूर, वाहनचालक, क्लीनर यासह इतर कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी संबंधित कंत्राटदारांना २३ मार्च रोजी दिला.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार या उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावर काम करणाºया मजुरांचीही एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी तसेच त्यांना मास्क, सॅनिटायझर वापर करण्याबाबत अवगत करावे. महामार्गावरील मजूर लगतच्या गावातील लोकांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकारी मोडक यांनी सर्व संबंधित कंत्राटदारांना दिला. या आदेशाचे पालन न करणाºया कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस