शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:04 IST

   वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

ठळक मुद्देपावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

  वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.पावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. परिणामी गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभाग, पंचायत विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा या विभागाची बैठक घेऊन याबाबत सुचना दिल्या. ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअर ईत्यादी सार्वजणिक स्त्रोतांची जैविक व रासायनिक पाणी नमुणे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. या कामात विलंब झाल्यास व लोकांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला.  ग्रामपंचायतींनी करावयाची कामे १) नियमित पाणी तपासणी करावी.२) पाण्याचे नियमित शुद्धिकरण करावे.३)  दर्जेदार (३४ टक्के क्लोरीन असलेली) ब्लिचिंग पावडरची खरेदी व पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.४)  पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा.

 दुषित पाणी नमुन्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर !एप्रिल महिन्यात  २१ टक्के पाणी नमुने जैविकदृष्ट्या दुषित आढळले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत व आरोग्य) यांच्यासह ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांची जिल्हा स्तरावर तातडीची सभा बोलवुन याबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत संबंधितांची चांगलीच कानउघडणी केली होती. परिणामी संबंधित यंत्रणेमार्फत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे मे महिन्यातील अहवालानुसार दुषित पाणी नमुण्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर आली आहे. यापुढेही असेच दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदWaterपाणी