निवेदनात म्हटले आहे की,सदर सभामंडप लोखंडी शेडने बांधले आहे. त्यामध्ये पूर्ण काम केले नसून काम अर्धवट केले आहे.त्यामध्ये सरपंच यांनी अपहार केला असून त्याची चौकशी करून एक महिन्यात काम पूर्ण करावे व सरपंचाला पदावरून हटवावे. ३ वर्षाअगोदर जि.प वाशिम येथून ५,५०,००० रुपयांचे सिमेंट काँक्रीटचे सभागृह जि.प सभापती पानुबाई जाधव यांचे निधीतून विहार परिसर मिलिंद नगर येथे मंजूर केले. परंतु ३ वर्ष होऊनसुध्दा सदर सभागृह सिमेंटचे न करता सरपंच यांनी सन २०२१ मध्ये टिनाचे पत्रे थातूरमातूर टाकून उभे करून दिले आहे. आजूबाजूला विटाचे बांधकाम न करता व खाली बेड काँक्रीट व टाईल्स किंवा फरशी न टाकता सदर टिनाचे सभा मंडप उभे करून कमीत कमी दीड लाख रुपयांपर्यत काम केले आहे. बाकीचे काम करणे बाकी आहे. ६ महिने झाली आहे तरी सरपंच हे पुढील काम करत नाही. विचारले असता आता दुसरे काम मंजूर करून त्यात पुढील कामे करतो असे सांगितले. त्यामुळे याची सखोल चौकशी करून कामाचे इस्टिमेट काय आहे हे पाहून मोक्यावर चौकशी करून पुढील कामे एक महिन्यात करावी. अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले. निवेदनावर रिपाइंचे तालुका अध्यक्ष तुकाराम खडसे, रामकृष्ण पंडित,देवानंद खाडे, विठ्ठल खडसे,देवराव खाडे, संतोष उंदरे,पंजाब बेलखेडे, अनिल भगत,देवानंद वंजारी,अरुण मनवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सभामंडपाच्या कामाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST