शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या समस्यांसाठी अभिनव आंदोलन

By admin | Updated: June 14, 2017 20:08 IST

आमदल सामाजिक संस्थेचा उपक्रम: सामाजिक संघटना, नागरिकांना सहभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांनीग्रस्त असलेल्या गरीबांची हाक शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदल ही सामाजिक संघटना करणार आहे. यासाठी त्यांनी १५ जून ते १५ सप्टेंबर २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधित गरीबांच्या उद्धारासाठी आवश्यक असलेला ११ कलमी कार्यक्रम घेऊन ह्यगरीबार्थ आंदोलनह्ण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.आमदलचे प्रमुख गंगाधर कांबळे यांच्या नेतृत्वात वाशिमसह अकोला, यवतमाळ, हिंगोली, परभणी आणि नांदेड या सहा जिल्ह्यात हे आंदोलन राबविण्यात येणार आहे. व्यापक जनहित साधल्या जाणाऱ्या या गरिबार्थ आंदोलनाचा ११ कलमी कार्यक्रमात गोरगरीब कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, असधन औद्योगिक धोरण तयार करावे, शेतमजूर, बेघर, बेरोजगारांच्या उत्थानासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, गाव-खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रुरल स्माल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनची निर्मिती करावी, सदा स्थलांतरीत आणि पाल वाडी वस्तीवरील फिरस्ती कुटुंबांसाठी फिरत्या रेशनकार्डची व त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षाची व्यवस्था करावी, सरपंचाला विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा, तसेच सरपंच रिलिफ फंडची उभारणी करावी, विधवा-परितक्त्या महिलांना किमान उपजिविका भागले इतके दरमहा पाच रुपये अनुदान मिळावे, बचत गटाच्या महिलांना कालसुसंगत उद्योजकीय ज्ञान मिळण्यासाठी जिल्हास्तरावर एक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करावे, भावी उद्योजकीय पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक विभागवार एक नवोत्तम उद्योजकी निर्माण केंद्र स्थापन करावे, सरकारच्या विविध योजना विकास कामांचा थेट जनतेपर्यंत जाणारा प्रचार-प्रसार फक्त लोककलेद्वारेच करून घेऊन त्यासाठी लोककलावंताना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, अपंगांच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, आदि मागण्यांचा समावेश आहे.