शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड-वाशिम रेल्वेमार्गासाठी अमरावतीच्या खासदारांचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:05 IST

नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  वाशिम ते कन्याकुमारी या उत्तर दक्षिण टोकाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत नरखेड-वाशिम या नवीन रेल्वे मार्गाची त्रिसदस्यीय समितीव्दारे पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या या रेल्वेमार्ग निर्मितीच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या संदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. नकारात्मक सर्वेक्षणामुळे ३० वर्षांपासून मागे पडलेल्या नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. भविष्यात वाशिम ते अमरावती हा रेल्वेमार्ग अस्तित्त्वात आला तर तो पश्चिम विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरून उद्योग क्षेत्रासाठी भरभराटीचा ठरणार आहे.  मागील ३० वर्षापासून नरखेड-वाशिम रेल्वेमार्गाचा मुद्दा मागे पडला होता; परंतु ९ जुलै रोजी रेल्वे अधिकारी यांच्या एका सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यात भेट देऊन या मार्गासंदर्भातील काही कागदपत्रे गोळा करून कृती समितीच्या सदस्यांशी चर्चाही केली. यामुळे या मार्गासाठी पुढाकार घेणारयासह जिल्ह्यातील युवा मंडळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरूळपीर येथील तालुका रेल्वे कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत १५ जुलै रोजी रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन पाठवित हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकरयाना  देशातील उत्तर दक्षिण अशा दोन्हीकडच्या बाजारपेठा उपलब्ध होणार असल्याने या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे, तर या मार्गाच्या निर्मितीसाठी सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी तालुका रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षपदी राम ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांची निवडही करण्यात आली. या रेल्वेमार्गाची मागणी जोर धरत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र सादर करून विदर्भ-मराठवाड्याच्या विकासास चालना देणाऱ्या या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा