शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ वॉर्ड स्पर्धेबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:18 IST

वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देपदाधिकार्‍यांसह, प्रशासनाच्या सक्रियतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम पालिका वगळता इतर ठिकाणी स्वच्छतेबाबत फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. राज्याचा संपूर्ण नागरी भाग हागणदरीमूक्त झाल्याची घोषणा १ ऑक्टोबर २0१७ रोजी करण्यात आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २0१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरात ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत ओल्या आणि सुक्या कचर्‍याचे विलगीकरण करून या कचर्‍यावर केंद्रित अथवा विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करण्याबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्यास लोकांना प्रेरित करून हागणदरीमुक्ती आणि स्वच्छतेबाबत शहरांची कायमस्वरूपी क्षमता वाढविण्यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून, सर्वच शहरातील प्रत्येक वार्ड या स्पर्धेत सहभागी होणेही बंधनकारक होते. अर्थात वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक नागरी स्वराज्य संस्थेतील वार्डांचा यात सहभाग असेल; परंतु या स्पर्धेतंर्गत वार्डात आवश्यक असलेले उपक्रम मात्र राबविण्यात येत असल्याचे दिसत नाही. यामध्ये प्रत्येक घरातून संकलित केलेल्या कचर्‍यातील ओल्या कचर्‍यावर वार्डातच विकेंद्रीत पद्धतीने प्रक्रिया करणे, वार्डात नेहमी कचरा दिसणार्‍या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे, नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीचे कार्यक्र म स्वत:च्या वार्डात घेणे, वार्डात प्लास्टिक बंदी राबविण आदि मुद्यांवर विशेष लक्ष देण्यात येत नसल्याने या स्पर्धेमागील शासनाचा उद्देश मात्र असफल ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना या स्पर्धेतंर्गत नमूद निर्देशानुसार कार्यक्रम राबवून प्रत्येक वार्डाची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करून २५ मार्च २0१८ पर्यंत शासनाला अहवाल पाठवावा लागणार आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या दिवसांत या स्पर्धेत जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कशी कामगिरी करतात. ते पाहणे महत्त्वाचे आहे. 

वाशिम शहरात स्वच्छतेचे वारेस्वच्छ महाराष्ट्र  अभियानांतर्गत वाशिम शहरामध्ये स्वच्छतेचे वारे वाहतांना दिसून येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे रात्रंदिवस मेहनत घेवून शहराला स्वच्छतेकडे नेतांना दिसून येत आहेत. या कार्यास नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह सर्वच पदाधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे त्यांना सहकार्य लाभतांना दिसून येत आहे. त्या पाठोपाठ कारंजा येथे काही प्रमाणात कार्य होतांना दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये रात्री सफाई कामगारांकडून शहर स्वच्छ केल्या जात आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक व अनेक ठिकाणी स्वच्छता पाळण्यासंदर्भात फलक लावण्यात आले आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानwashimवाशिम