शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:37 IST

प्रशासनाने त्याची लगेचच दखल घेतली असून, विविध ठिकाणाहून पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले, तर टँकरची संख्या १६ वरून वाढून २५ वर गेली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांत वाढ झाली आणि आलेल्या प्रस्तावांनाही जिल्हास्तरावरून तडकाफडकी मंजुरी देण्यात आली.

वाशिम: पाणीटंचाई उपाय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासनाची उदासीनता असल्याने जनतेचे पाण्याअभावी हाल सुरू होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने ९ मे रोजीच्या अंकात ‘पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडेच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून जनतेची समस्या उजागर केली. प्रशासनाने त्याची लगेचच दखल घेतली असून, विविध ठिकाणाहून पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांची संख्या वाढली आहे. त्यातच आलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरीही देण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले, तर टँकरची संख्या १६ वरून वाढून २५ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासनाने ४.४८ कोटी रुपयांच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला असला तरी ९ मेपर्यंत पाणीटंचाई असलेल्या बहुतांश गावांत प्रशासनाकडून अद्याप आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात उदासीनता होती, तसेच प्रस्तावांना मंजुरातीलाही विलंब लागत असल्याने जनतेचे पाण्याअभावी हाल सुरू होते.   प्रशासकीय आकडेवारीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई आहे. या पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार ५ नळ योजनांची दुरुस्ती ७४ गावांसाठी टँकर आणि ४९९ गावांसाठी विहिर अधिग्रहण करावयाचे होते. कृती आराखड्याचा कालावधी १ आॅक्टोबर २०१७ ते ३० जून २०१७ या चार महिन्यांचा असताना मे महिन्याचा पहिला पंधरवाडा अर्ध्याहून अधिक उलटला तरी अद्याप निम्म्या योजनांचीही अंमलबजावण झाली नव्हती. प्रशासनाच्या माहितीनुसार या आराखड्यातील उपाय योजनांपैकी  ६१.६० लाख रुपये खर्चाच्या १३२ विहिरींचे अधिग्रहण झाले होते, तर ८८.७७ लाख रुपये खर्चाच्या १६ गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्याशिवाय ७.३१ लाख रुपये खर्चाच्या ३ नळ योजनांची दुरुस्ती करण्यात आली होती.  उपाय योजनांच्या अंमलबजावणीची ही आकडेवारी केवळ २९ टक्के होती. उपाय योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडेच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच तालुकास्तरावरून पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांत वाढ झाली आणि आलेल्या प्रस्तावांनाही जिल्हास्तरावरून तडकाफडकी मंजुरी देण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे, अर्थात अधिग्रहित विहिरींची संख्या १९ ने वाढली. त्याशिवाय टँकरची संख्या ९ ने वाढून २५ झाली आहे. अद्यापही ३४६ गावांतील उपाय योजनांची अंमलबजावणी प्रलंबित आहे.  टँकर, विहिरींचे नवे प्रस्ताव जिल्हास्तरावरजिल्ह्यात पाणीटंचाई गावांच्यावतीने पंचायत समित्या आणि तहसील कार्यालयांमार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहण करण्याबाबत नवे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार १३ मे रोजी विहिर अधिग्रहणाचे ३ प्रस्ताव, तर टँकरचे ८ प्रस्ताव प्राप्त असून, या प्रस्तावांना १५ मे रोजीच मंजुरी देऊन संबंधित गावांची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. तथापि, संबंधित गावांसाठी विहिरी अधिग्रहण करताना पडताळणी करण्यात येणार असून, टँकरची गरज असेल, तरच तातडीने टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय