शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ;  वाशिमात आक्रोश मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:48 IST

सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात काही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून, काही मुलींचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाविरूद्ध ताशेरे ओढत सामाजिक संघटनांनी ७ फेब्रुवारी रोजी वाशिम शहरातून भव्य आक्रोश मोर्चा काढला. बेपत्ता मुलींचा शोध तातडीने लावण्याची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.वाशिम शहर व जिल्ह्यात अलिकडच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही मुलींचा शोध लागला तर काही मुली अजूनही बेपत्ता आहेत. वाशिम शहरातील लाखाळा भागातील एक १५ वर्षीय मुलीचे १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले. यासंदर्भात वाशिम शहर पोलीस स्टेशनला तक्रारही देण्यात आली. अत्यंत संवेदनशील व चिंताजनक असणाºया या प्रकरणाचा शोध अद्याप लागला नसल्याने पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेच्या महिला आघाडीसह मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना आदी सामाजिक संघटनांनी केला. या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी स्थानिक शिवाजी चौकातून आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक, सिव्हिल लाईन मार्गे हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे शाळकरी मुले, मुली अक्षरशा: दहशतीखाली वावरत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. यावेळी शेतकरी संघर्ष संघटना, महिला आघाडी, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, छावा क्रांतीवीर सेना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थिनी, महिला, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन