शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:19 IST

चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गणित विषयाचा पेपर २५ जुलै रोजी झाला असून, या पेपरमध्ये दोन गुणांचा प्रश्न चुकीचा असल्याचा दावा गणित विषयाचे प्रा. पी.एन. देशमुख यांनी केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन गुण देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी केली. लोकमतने या संदर्भात २६ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सुरू असून, २५ जुलै रोजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर झाला. प्रश्नपत्रिकेतील १३ व्या क्रमांकाचा पर्यायी प्रश्न चुकीचा असल्याची बाब रिसोड येथील परीक्षा केंद्रावर गणित विषयाचे प्रा.पी.एन देशमुख यांच्या निदर्शनात आली. या पर्यायी प्रश्नाला २ गुण असून, हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन गुणाचे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमधून वर्तविली जात आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या या प्रश्नाचे दोन गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी प्रा. देशमुख यांनी केली होती. या संदर्भात लोकमतनेही २६ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन माध्यमिक परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल परिक्षा मंडळाने घेतली असून, त्वरित याबाबत माहिती घेतली व   या चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक, तपासणीस यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान  टळले आहे.  

इयत्ता बारावीच्या पुरवणी परिक्षेतील गणित विषयातील चुकीच्या प्रश्नाबाबत राज्यातील सर्व परीक्षा तपासनीसांना राज्य परिक्षा मंडळातर्फे सूचना देण्यात आल्या असून, या चुकीच्या प्रश्नामुळे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना दोन गुण देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. - परेश खर्चे परिक्षा मंडळ कर्मचारी, अमरावती

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल