शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कोरोना काळात अपहरणाच्या घटना वाढल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:39 IST

kidnapping increased Washim District यंदा जिल्ह्यातील एकूण ५२ मुली, महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनांची नाेंद.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाकाळात यंदा जिल्ह्यातील एकूण ५२ मुली, महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनांची नाेंद असून, गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा १० ने जास्त आहे. गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४२ जणींचे अपहरण झाले होते. युवक, युवतींमध्ये सोशल मीडियाचा अतिरेक वापर होत असल्याने काही अनुचित प्रकारही घडत असल्याचे दिसून येते.  विशेषत: १८ वर्षाआतील मुले, मुलींमध्ये सोशल मीडियाच्या विविध अपच्या वापर जास्त होत असल्याने आणि यावर अनेक पालकांचे नियंत्रण राहत नसल्याने फारशी समज नसलेल्या या वयात मुली या पळून जाण्याचा निर्णय घेतात तर अनेक मुलींचे विविध कारणामुळे अपहरणही केले जाते. जिल्ह्यात गेल्यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरी भागातील १२ तर ग्रामीण भागातील २० अशा एकूण ४२ जणींचे अपहरण झाले होते. यामध्ये १८ वर्षाआतील ३९ तर १८ वर्षावरील ३ जणींचा समावेश होता. यापैकी ९५ टक्के   घटनांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. यंदा कोरोनाकाळात मुलींचे अपहरण होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ५२ जणींचे अपहरण झाले. यामध्ये ८ वर्षाआतील ४६ तर १८ वर्षावरील ६ जणींचा समावेश होता. यापैकी अनेक घटनांचा छडा लावण्यात यंत्रणेला यश आले.  विशेषत: लाखाळा परिसरातील अपहरण झालेल्या मुलीच्या प्रकरणाचा विशेष छडा लावला.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या