शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; रिठद गावाला पुराचा वेढा; संपर्क तुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:24 IST

रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. दरम्यान रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला. शिरपूर परिसरातील जवळपास ३० एकर जमिन पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले.यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीपासनूच कधी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १४ जूनपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जवळपास ११ दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. २५ ते २७ जून दरम्यान पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाही पाऊस आल्याने शेतकरी सुखावला. दरम्यान ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वाशिम, रिसोड, मालेगावसह जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रिठद परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने गावाजवळून वाहणाºया अढळ नदीला पूर आला. पुराने गावाला वेढा घातल्याने जवळपास ३ ते ४ तास गावाचा संपर्क तुटला. नदीकाठ परिसरातील शेकडो एकर शेतातही पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शिरपूर परिसरातही पावसाचा जोर अधिक होता. रिसोड शहरातही गुरूवार, शुक्रवारी सायंकाळनंतर पाऊस झाल्याने काही दुकानांमध्ये पाणी शिरले.वाशिम शहरातही पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले. खड्डयांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला. चमूतर्फे पाहणीसंततधार पावसामुळे रिठद, शिरपूरसह अन्य ठिकाणी सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळावी याकरीता ४ जुलै रोजी शेतकºयांनी भ्रमणध्वनीवरून कृषी अधिकाºयांकडे पाहणी करण्याची मागणी केली. सोमवारपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात पावसामुळे जेथे पिकांचे नुकसान होत आहे ्रकिंवा पिकांचे नुकसान झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आल्या, तेथील नुकसानाची पाहणी महसूल व कृषी विभागाच्या चमूतर्फे केली जात आहे. ४ जुलै रोजीच्या पावसाने ज्या भागात पिकांचे नुकसान झाले, तेथे पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :washimवाशिमfloodपूर