शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोहरी येथे  ग्रामस्थांच्या हस्ते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:03 IST

मोहरी  :  येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५  दिवसाची ही स्पर्धा आहे. 

ठळक मुद्देस्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १०० मिटर खोदकाम झाले असुन गावातील मंडळीचा मोठा सहभाग दिसुन आला.  ई क्लास शिवारात भुमातेचे पुजन करुन या कामाचे उद्घाटन सरपंच संजय गावंडे यांच्या हस्ते करुन कामाला सुरुवात करण्यात आली.

मोहरी  :  येथे सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचे उद्घाटन मोहरी येथ्ीाल ग्रामस्थाच्याहस्ते करण्यात आले. गाव पाणीदार करण्यासाठी व पाण्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी सत्यमेव जयते मार्फत ८ एप्रिल ते २२ मे या ४५  दिवसाची ही स्पर्धा आहे. 

यामध्ये श्रमदान, मशीन यंत्राच्या सहा्याने खोदकाम आहे. त्यानंतर  गावाच्या दुप्पटर रोपटे तयार करणे म्हणजे नर्सरी तयार करणे, माती परिक्षण करणे , शेततळे सिमेंट प्लॅग इतर कामे या ४५ दिवसात करणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १०० मिटर खोदकाम झाले असुन गावातील मंडळीचा मोठा सहभाग दिसुन आला. सलग ४५ दिवस गावकरी श्रमदान करतील व गाव पाणीदार होण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील. यामध्ये  महिलांचा भरपुर सहभाग होता. मोहरी येथे सर्व प्रथम विठ्ठल रुख्माई मंदिरात टिकास, फावडे, टोपले, विठ्ठलाचे पुजन करण्यात आले. व गावातुन मोठी रॅली काढुन बौध्द विहारात बाबाबसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. 

 ई क्लास शिवारात भुमातेचे पुजन करुन या कामाचे उद्घाटन सरपंच संजय गावंडे यांच्याहस्ते करुन कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पाणी फाउंडेशनची टिम हे काम बघण्यातही मोहरीला आली व त्यांनी श्रमदान करणाºयांना मार्गदर्शन केले. पाण्याच्या दुष्काळाविषयी मार्गदर्शन केले. 

यावेळी मोहरी सरपंच संजय गावंडे ,उपसरपंच संगीत इंगोले सदस्य, विनायक मिसाळ , अ‍ॅड.मनिष म्हातारमारे ,निता पाटील, शांताबाई ठाकरे, रेखा म्हातारमारे, उज्वल मिसाळ, बेबीबाई इंगोले, माजी सरपंच प्रकाशराव म्हातारमारे, नितीन गावंडे, निलेश मिसाळ, गोपाल मिसाळ, रवि एडोले, नारायण म्हातारमारे, संदेश इंगोले, किरण मिसाळ, रुख्मीना निलटे, अनेक महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा