तालुक्यातील गरजू रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने वाशिमला जाणाऱ्या रुग्णांना मालेगावातच सुविधा मिळणार असल्याचे मत यावेळी रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. भगीरथ जाजू , डॉ. विवेक माने, डॉ. विजयराव सोनोने, डॉ. सौरभ भुतडा, डॉ. सुनील तरोडे, डॉ. आशिष वाघमारे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रघुनाथ चापे आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार डॉ. सचिन चापे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी किशोर चापे, विशाल भोकरे, गणेश शर्मा, अमोल तिवाले आदिंनी सहकार्य केले. (वा.प्र.)
----------
विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार: अॅड. सरनाईक
रिसोड : विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या, तसेच जुनी पेन्शन योजना व शालार्थ प्रकरणे प्राधान्याने सोडविणार असल्याचे, मत अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी स्थानिक शिवाजी विद्यालय येथे ८ जानेवारीला शिक्षक सहविचार सभा व सत्कार आयोजन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक पंजाबराव देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून सचिव भिकाजीराव नागरे, संचालक गोपीकिशन सिकची, संचालक संजय जिरवणकर, संचालक डॉ. रामेश्वर नरवाडे, माजी मुख्याध्यापक कमलाकर टेमघरे, तात्याराव देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी ‘‘हा विजय तुमच्या सहकाऱ्यांमुळेच साकार झाला आहे. तुमचे परिश्रम, नियोजन हेच विजयाचे पाईक आहे. तुमचे अजोड कार्य मी कधीही विसरणार नाही. शिक्षकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहणार आहे’’, असे मत आमदार सरनाईक यांनी मांडले. याप्रसंगी प्रा. चव्हाण, शिक्षक तालुका कार्यकारिणी अध्यक्ष सुधाकर कोल्हे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहम्मद आरीफ तर संचालन प्रा. अनिल मडके व आभार प्रदर्शन शिक्षक डिगांबर पाचारणे यांनी केले. (वा.प्र.)