शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 दीड वर्षांत शेतीसाठी दिवसाही वीज मिळणार; सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत १७५ मेगावॅट होणार वीजनिर्मिती

By दिनेश पठाडे | Updated: November 29, 2023 19:06 IST

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे.

वाशिम: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे निविदा प्रसिद्ध झाले आहे. पुढील अठरा महिन्यात त्याचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा नियमित वीज पुरवठा होईल, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी दिली.

२९ नोव्हेंबरला जिल्हा नियोजन भवनात महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठक पार पडली. यवेळी एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा, महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते. विश्वास पाठक म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या सिंचनासाठी दिवसा आणि रात्री पाणीपुरवठा होतो. परंतु केवळ दिवसा नियमित पाणीपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी राज्य शासनाने सौर ऊर्जेचा वापर करून सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीसंबंधी ३८ उपकेंद्रांना वीज पुरवठा होणार असून जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याचा लाभ होईल. ही कामे अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. आशिष चंदाराणा म्हणाले की, नवीन विद्युत जोडणी देताना ग्राहकांना गरजेपुरतीच कागदपत्रे मागावीत. वाशिम जिल्ह्यातील तूट अधिक असलेल्या फीडर्सवर लक्ष केंद्रित करून तेथे वीजबिल वसुलीवर अधिक भर द्यावा. आरडीएसएस अंतर्गत ७५७ कोटींची कामेवाढती मागणी ध्यानात घेता वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी आरडीएसएस ही महत्त्वाची योजना अंमलात आणली जात आहे. त्यामध्ये वाशिम जिल्ह्यात ७५७ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत. नवीन वीज उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर्सची संख्या वाढविणे, स्मार्ट मीटर बसविणे, विद्युत वितरण प्रणाली सुधारणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. 

टॅग्स :washimवाशिम