शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव; करडई पिकालाही राहणार पसंती!

By संतोष वानखडे | Updated: October 11, 2023 17:16 IST

कृषी विभागाचे पीक पेरणी नियोजन : पेरणीयोग्य १.१५ लाख हेक्टर क्षेत्र

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बी हंगामाकडे लागून आहे. रब्बी हंगामात यंदाही गहू, हरभऱ्यालाच सर्वाधिक पसंती राहणार असून, कृषी विभागाने त्यादृष्टीने १.१५ लाख हेक्टरवर नियोजन केले आहे.

यंदा मान्सूनचे विलंबाने आगमन झाल्याने खरीप हंगामात पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच पिवळा मोझॅक व अन्य रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाने निराशा केल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे. परतीचा पाऊसही पाठ फिरवित असल्याने रब्बीत पिकांच्या सिंचनासाठी प्रकल्पांतून पुरेसे पाणी मिळणार की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होते.

यंदा १ लाख १५ हजार ७७० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक ७५ हजार हेक्टरच्या आसपास हरभरा पेरणीचा अंदाज वर्तविला आहे . सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी गव्हाच्या पेरणीला प्राधान्य देतात. ३५ हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या करडईकडेही काही शेतकरी वळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याशिवाय मसूर, राजमा, सूर्यफूल, मोहरी या पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. मात्र, या पिकांखालील क्षेत्रफळ अत्यल्प राहिल, असे सांगण्यात येते.असे आहे रब्बी पीक पेरणीचे नियोजन (हेक्टर)पीक / नियोजन

गहू / ३५०००हरभरा  / ७५०००ज्वारी /  १८००करडई / १५००इतर तृणधान्य / ५००इतर कडधान्य / १५००इतर गळीतधान्य / ३५०

टॅग्स :Farmerशेतकरी