शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘लेक शिकवा’ अभियानाची अंमलबजावणी तकलादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:20 IST

वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे या अभियानाची अंमलबजावणी बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदा सलग तिसऱ्या वर्षी सर्व शाळांमधून महिनाभर ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या उदासिनतेमुळे या अभियानाची अंमलबजावणी बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ३ जानेवारीपासून २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील शाळांमध्ये ‘लेक शिकवा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संबंधित सर्व शिक्षणाधिकाºयांना दिल्या होत्या. त्यानुषंगाने विद्या प्राधिकरणाने ३ ते २६ जानेवारीदरम्यान शाळांमध्ये राबवावयाचा कृती कार्यक्रमही जाहीर केला. याअंतर्गत ३ जानेवारीला पथनाट्य, प्रभातफेरीच्या माध्यमातून मुलींमध्ये शिक्षणविषयक आवड निर्माण करणे व पालकांमध्ये जनजागृती करणे, ४ जानेवारीला मुलींच्या आई-वडिलांचा सत्कार, कर्तुत्ववान महिलांच्या मुलाखती घेणे, ५ जानेवारी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, ८ जानेवारीला व्यावसायिक मार्गदर्शन, ९ जानेवारीला मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सन्मान, १० जानेवारीला महिला सक्षमीकरणावर प्रश्नमंजुषा, १२ जानेवारीला जनजागृतीपर विविध कार्यक्रम; तर त्यापुढे २६ जानेवारीपर्यंत ‘गुड टच- बॅड टच’ यासह अन्य स्वरूपातील महत्वाची माहिती मुलींना देण्याचे निर्देश शिक्षणाधिकाºयांना देण्यात आले होते. मात्र, शाळांमध्ये या महत्वाकांक्षी उपक्रमाची विशेष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ‘लेक शिकवा’ हे अभियान बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘लेक शिकवा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यापुर्वीच देण्यात आलेल्या आहेत. त्याचा आढावा सर्व शाळांकडून घेण्यात येईल.- टी.ए. नरळे,माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणgovernment schemeसरकारी योजना