शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातील शासकीय जागेवरील अतिक्रमणे होणार नियमानुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 14:03 IST

कारंजा लाड (वाशिम) : शासनाच्या धोरणानुसार, निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी अखिल भारतीय मुस्लीम गवळी समाज संघटनेने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : शासनाच्या धोरणानुसार, निवासी प्रयोजनार्थ शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी अखिल भारतीय मुस्लीम गवळी समाज संघटनेने केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली असून, तसे निर्देश नगरविकास विभागाने नगर परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्याअनुषंगाने अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही कारंजा शहरात केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व महसूल विभागाच्या अखत्यारितील सर्व प्रकारच्या शासकीय जमिनींवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना नगर विकास विभागाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मुस्लीम गवळी समाज विखुरलेला असल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात शासनाच्या विविध जागेवर गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्य करीत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार कारंजा शहरातील ४० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. घराचा कर भरत असून, अजुनही शासकीय जागा असाच उल्लेख असल्याने त्यांना कुठलीही बँक घर बांधण्यासाठी कर्ज देत नाही. घोषित झोपडपट्टी असल्याने आवास योजना राबविल्या जाते. मात्र शासकीय जागेचा शिक्का पुसला न गेल्याने ही बाब त्या झोपडपट्टीधारकांना अडचणीची ठरते. सध्या सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी जागेचा मालकी हक्क असल्याचा पुरावा मागण्यात येते. नागरिकांजवळ हे पुरावे नसल्यामुळे त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. अशा लाभार्थींना जागेचा मालकी हक्क असल्याचा पुरावा देण्यात यावा, अशी मागणी अ.भा.मुस्लीम गवळी समाज संघटनेने उपविभागीय अधिकाºयांकडे एका निवेदनाद्वारे केली होती़ याशिवाय राष्ट्रीय समन्वयक जुम्मा प्यारेवाले यांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच राज्य समन्वयक फिरोज शेकुवाले, जुम्मा पप्पूवाले, सलीम गारवे, सलीम प्यारेवाले, मन्नान रायलीवाले, नासिर चौधरी व जिल्हाध्यक्ष ताज पप्पूवाले यांनी या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने त्यांच्या मागणीची दखल घेत काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व महसूल विभागाच्या अखत्यारितील सर्व प्रकारच्या शासकीय जमिनींवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.  त्या अनुषंगाने कारंजा शहरात आता कार्यवाही केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा