शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:45 IST

वाशिम : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गोवंश हत्या व जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या.यावेळी जिल्हा पशुसंवर्ध उपायुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. इर्शाद खान, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एन. डी. खाजोने, प्रभारी सहाय्यक वन संरक्षक एस. आर. नांदुरकर, पोलीस निरीक्षक बी. जी. कºहाळे यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार राज्यात गोवंशीय प्राण्यांची कत्तल करणे तसेच कत्तलीकरिता वाहतूक करण्यास मनाई आहे. गोवंशीय प्राण्यांची कत्तलीकरिता खरेदी विक्री अथवा वाहतूक होत असल्यास त्यावर परिवहन विभाग व पोलीस विभागाने कारवाई करावी तसेच गोवंशीय प्राण्यांची कत्तल होणार नाही, यासाठी सुद्धा आवश्यक कार्यवाही करावी. प्राण्यांची वाहतूक करतांना त्यांना ईजा होणार नाही, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्राण्यांची वाहनांमधून वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्राण्यांची वाहतूक करणाºया वाहनधारकाकडे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, असे प्रमाणपत्र नसल्यास त्या वाहनावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिल्या. तसेच यापुढे होणाºया सभेमध्ये या अनुषंगाने जिल्ह्यात किती वाहनांवर कारवाई करण्यात आली, याचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले. या बैठकीत उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांना केंद्राचा प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र शासनाचा प्राणी संरक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियममधील नियम व अटींचे सविस्तर माहिती देण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय