शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ५९ अंगणवाडी बांधकामाचे लवकरच कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:15 IST

५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी यापूर्वीच दिलेली आहे.

बालकांची गैरसोय दूर होणार : निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली दिल्यानंतर इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच, कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. वाशिम जिल्ह्यात एकूण १०७६ अंगणवाड्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार आणखी काही नवीन अंगणवाडी केंद्रांचा मुद्दा समोर आला होता. सन २०१८-१९ या वर्षात २० आणि सन २०१९-२० या वर्षात ३९ अशा एकूण ५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी यापूर्वीच दिलेली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या रकमेच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरीदेखील प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रक्रिया पूर्ण होताच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.सन २०१८-१९ या वर्षात मारसूळ, खंडाळा शिंदे, करंजी क्र. २, अंचळ, पार्डी तिखे, घोटा, चिंचाबा भर क्र.१, मूर्तिजापूर, पेडगाव क्र. ४, माळशेलु क्र.२, लखमापूर, म्हसणी क्र. २, दापुरा बु. क्र.२, गोस्ता क्र.२, खेर्डा खु. मिनी, तोरनाळा क्र.२, जांभरून भी., काटा क्र.३, वाघोली खु., कन्हेरी अशी एकूण २० अंगणवाडी केंद्र साकारली जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी ८.५० लाख रुपये निधी प्रस्तावित आहे.तसेच सन २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या २.२५ कोटी तरतुदीच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरी मिळालेली आहे. यामध्ये पिंपळा, सोनाळा क्र.१, आमखेडा मिनी, मोप क्र.२, शेलु खडसे, मोहजा बंदी, भर जहॉगीर क्र.४, लोणी बु. क्र.१, कोयाळी बु., पिंपरखेडा, वाडी वाकद, कंकरवाडी क्र.२, येवती क्र.१, जवळा, कुºहा, वाकद क्र ६, वडजी, शेलगाव राजगुरे, नावली क्र १, येवती क्र २, कुकसा, कळमगव्हाण, नंधाना क्र १, वरूड तोफा, किनखेडा, हिवरापेन, मुंगसाजी नगर, सवड क्र.३, आसोला खु. क्र.१, दापुरा खुर्द, जगदंबानगर, जनुना, उज्वलनगर, वटफळ क्र.२, फुलउमरी क्र.१, पूर, केकतउमरा, किनखेडा ता. वाशिम, कामठवाडा अशा ३९ अंंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद