गिरोली (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील गिरोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी २९ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता छापे टाकून अवैध गावठी दारूसह मोह सडवा मिळून एकूण १४ हजार ३५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी तिघांना अटकही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार २९ एप्रिल रोजी गिरोली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सकाळी १0 वाजताच्या सुमारास अवैध दारू गाळप होत असलेल्या ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईत त्यांनी ६00 लीटर गावठी दारू, १६ लीटर मोह सडवा मिळून एकूण १४ हजार ३५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी गिरोली येथील सदाशिव पिसाराम डांबरे, मैनाबाई नामदेव पवार, तसेच हळदा ये थील अमोल पांडुरंग राठोड यांना अटक करण्यात आली.
गिरोली येथे अवैध गावठी दारू जप्त
By admin | Updated: May 1, 2016 00:59 IST